जयश्री नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित मध्ये आपले स्वागत आहे.
३० मार्च २०२५ रोजी
स्थापन झालेल्याजयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. समाजातील प्रत्येक
घटकाला आर्थिक स्वातंत्र मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु
करण्यात आलेली कंपनी भारत सरकार अंतर्गत रजिस्टड आहे. (Reg. No:
SAT/PLN/RSR/CR/625) सरकारने दिलेल्या सर्व नियम व अटींचे
काटेकोरपणे पालन केले जाते. तुमच्या कष्टाचा कमाईला सुरक्षित
ठेऊन त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळण्याचा हेतुने संस्थेमध्ये
अनेक लाभदायी ठेव योजना उपलब्ध आहेत. आपण सर्व जाणतो पैसे
कमवायला किती कष्ट करावे लागतात रक्कम छोटी असो अथवा मोठी असो ती
कमाई आपल्याला महत्वाची असते. तुमच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ
होवो. त्याच बरोबर ती सुरक्षित असावी याकरिता आमचे अनेक ग्राहक
आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत. आणि त्या विश्वासास
आम्ही पात्र ठरतोय याचा आम्हाला अधिक आनंद आहे. तुम्ही निश्चिन्त
रहावे आणि तुमची गंतवणूक सुरक्षित असावी याकरिता आमचा प्रत्येक
कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहे. प्रत्येक कर्मचारी हा अत्यंत
अनुभवी आहे. अनेकांमध्ये प्रतिभा असते मात्र आर्थिक बाजू भक्कम
नसल्याने त्यांना त्यांच्या प्रतिभेचे व्यवसायात रुपांतर करता
येत नाही. अशा सर्व नविन व्यवसायिकांना संस्थेच्या वतीने आर्थिक
सहाय्य पुरविले जाते. तसेच महिला सक्षमीकरणात संस्थेला आपल्या
जबाबदारीची जाणीव आहे. संस्थेचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत असून
त्यामुळे तत्पर सेवा दिली जात आहे.भविष्यातील येणाऱ्या अडचणी
कोणालाही सांगून येत नाहीत. त्याकरीता आपण नेहमी तयार असायला
हवे. किमान आर्थिक अडचणींकरीता आपण नक्कीच तयार राहू शकतो. गरज
आहे. ती फक्त बचत आणि योग्य गुंतवणूक करण्याची. तुमच्या
गुंतवणुकीवर तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळावा याकरिता
संस्थेमध्ये विविध योजना उपलब्ध आहेत.कधी-कधी आपल्या समोर अशा
काही आर्थिक अडचणी उभ्या राहतात की त्याकरीता आपण तयार नसतो, अशा
वेळी आपल्याला हवी असते ती हक्काची आर्थिक साथ आणि आपल्याकडील
आम्ही आपल्या माणसांकरिता नेहमीच तत्परतेने उभे असतो. आपल्या
संस्थेमध्ये सोनेतारण कर्ज अगदी ५ मिनीटात उपलब्ध आहे. आणि इतरही
अनेक कर्ज योजना संस्थेमध्ये उपलब्ध आहेत